मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने सिद्धार्थ गार्डन परिसरातील हुतात्मा स्मारकला पोलीस प्रशासनाने दिली मानवंदना
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 17, 2025
आज बुधवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता माहिती देण्यात आली की 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्यावतीने सिद्धार्थ गार्डन येथील हुतात्मा स्मारक समोर स्वातंत्र्यवीरांना हवेमध्ये फायर करून मानवंदना देण्यात आली आहे, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह विविध आमदार खासदार शासकीय अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदरील उत्सव बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.