पोंभूर्णा: आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी कृती संघर्ष समितीचे पोंभुर्णा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा व धनगर ह्या जमातीला समाविष्ट करू नये. अनुसूचित जमातीतील बोगस आदिवासींना हटवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आदिवासी संघर्ष कृती समिती पोंभूर्णा तालुक्याचे वतीने मंगळवारी दि.२३ सप्टेंबरला पोंभूर्णा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आदिवासी संघर्ष कृती समिती पोंभूर्णा चे पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार शेलवटकर यांचेकडे मागणीचे निवेदन दिले.