सातारा: महाबळेश्वर येथील बोटमन कम कामगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Satara, Satara | Sep 18, 2025 साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी २ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना महाबळेश्वर येथील बोटमन तथा कामगारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ठराव क्रमांक ७८, पान क्रमांक ९, मुद्दा क्रमांक ९नुसार रोईंग बोट व पॅडल बोट यांचे बोटमन चार्ज तासानुसार मान्य करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित रक्कम कामगारांना अदा करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.