बार्शीटाकळी: 'त्या' तरुणासाठी राष्ट्रवादी सरसावली, शक्य ती मदत करणार माजी उपमहापौर रफिक सिद्दिकी यांची प्रसार माध्यमाला माहिती
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी शहरात राहणाऱ्या मंगेश इंगळे या तरुणाला आवश्यक ती शक्य तितकी लागणारी मदत आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कडून करण्यात येणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांना लग्नासाठी मुलगी शोधून द्या असं पत्र एका तरुणांनी दिलं होतं त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कडून शक्य तितकी मदत आता आम्ही करणार आहोत अशी माहिती पक्षाच्या वतीने रफिक सिद्दिकी यांनी दिली आहे