शिरूर कासार: शिरापूर गात येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाला आमदार संदीप क्षीरसागर यांनी एनडीआरएफच्या मदतीने वाचवले
बीड मतदारसंघातील शिरापूर गात येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या आईसह लहान बाळासह नागरिकांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ धाव घेऊन सुरक्षित स्थळी हलवले. या आपत्तीजन्य परिस्थितीत पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापनाची टीम उपलब्ध करून देण्यात आली. आमदार क्षीरसागर यांनी पालकमंत्री पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.