वैजापूर नगर पालिकेच्या निवडणुकीचा निकाल हा 3 तारखेहून 21 तारखेवर पुढे ढकला गेला आहे.दरम्यान मतपेट्या ठेवलेल्या strong रूम मध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हिआर हा 3 तारखेच्या निकालाच्या अनुषंगाने लावला गेला होता मात्र दिवस वाढल्याचे सीसीटीव्ही फुटेज स्टोरेज करण्यासाठी मोठी harddisk लावणे गरजेचे होते यामुळे सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी सर्व उमेदवार व प्रतिनिधी यांना बोलावून घेत त्यांच्या समक्ष ही हार्ड डिस्क चेंज केली यासोबतच जुनी हार्ड डिस्क ही सील केली.