नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथील गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी नुकताच छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे.अश्पाक निसार शेख (रा. चांदा) हा त्या ठिकाणी विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून तयार दारू जप्त करण्यात आली आहे.