नवी मुंबई शहरामध्ये विविध खेळांना पोषक वातावरण निर्मितीसाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे सातत्यपूर्ण आयोजन केले जात आहे. तसेच खेळांसाठी ठोस पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने, ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिशन व नवी मुंबई ॲमॅच्युअर व्हॉलीबॉल असोसिएशन तसेच कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी यांच्या सहकार्याने ‘नवी मुंबई महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2025-26’ चे आयोजन दि. 5 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात आलेले आहे.