पनवेल : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा एक भाग म्हणून विविध शाळांमधून “पर्यावरण दूत” निवडण्याची प्रक्रिया पार पडली.