पोलादपूर: पोलादपूर तालुक्यात उबाठा गटाला खिंडार, कार्यकर्त्यांचा गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
दीपावलीच्या शुभमुहूर्तावर, निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच कोंढवी विभागातून उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख मंगेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी आज बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला तालुक्यातील आणि विभागातील शिवसेना तसेच युवासेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.