पालघर: अँटिक पीस देण्याच्या नावाने एव्हरेशाईन सिटी येथे वृद्धाची लाखोंची फसवणूक
आचोळे पोलीस ठाणे हद्दीत एका वृद्धाची अँटिक पीस देण्याच्या नावाने दोघांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्षासाठी परिसरातील वृद्धाचा विश्वास संपादन करून आरोपी मेहता आणि तिचा साथीदार परमेश्वर पाल या दोघांनी साडेचार लाख रुपये वृद्धाकडून घेतले.मात्र परतावा देण्यात आला नाही, त्याचप्रमाणे पैसे देखील परत करण्यात आले नाही. याप्रकरणी दोघा आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा आचोळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.