सेवाग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी धीरज जनबंधु यांचा मुलगा यहोशु जनबंधु वय 23 वर्ष हा दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास बाथरूमचा दरवाजा बंद करण्याकरिता गेला असता बाथरूमच्या लोखंडी कडीला इलेक्ट्रिकचा करंट लागून खाली पडला,त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,याची माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली,पोलिसांनी सदर घटनेबाबत मर्ग दाखल आहे.पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे.