परभणी: पाथरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापतीवर अविश्वास ठराव जिल्हाधिकार्यांकडे दाखल
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अनिल नखाते यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून, या ठरावावर १२ संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हा अविश्वास ठराव आज शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यां सादर करण्यात आला. सदर ठराव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम, १९६३ मधील कलम २३ (अ) नुसार दाखल करण्यात आला.