मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संजय श्रावण काळे (वय ५२, रा. कोठारी नगर, हरिविठ्ठल नगर) यांना धावत्या रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील टॉवरसमोरील रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.