घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने, त्या ठिकाणी खेळणाऱ्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी, २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील सुजदे गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, निष्पाप मुलाच्या मृत्यूमुळे सोनवणे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.