हिंगोली: हिंगोलीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोरात डिग्रस पाटीवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. डॉ. रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजता हिंगोली औंढा नागनाथ रस्त्यावर डिग्रस पाटी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला