रामटेक तालुक्यातील चिचाळा येथील शेतकरी अनिल शिवदयाल लील्हारे वय 35 वर्षे यांच्या घराला लागून असलेल्या पशूंच्या गोठ्याला आग लागल्याने शेतकऱ्याचे अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात कृषी साहित्यसह 2 दुचाकी चे टायर ही जळून खाक झाले आहे. ही घटना शुक्रवार सत्तावीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. सकाळी दहा वाजताच्या दरम्यान तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच कविता बसिने उपस्थित होते.