परभणी: कार्तिकी एकादशीसाठी आदिलाबाद –पंढरपूर विशेष रेल्वे गाड्या : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या प्रवास होणार सोयीस्कर
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वेने आदिलाबाद – पंढरपूर – आदिलाबाद या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 07613 आदिलाबाद – पंढरपूर विशेष आदिलाबाद येथून शुक्रवार 31 ऑक्टोबर आणि मंगळवार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2.00 वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 07614 पंढरपूर – आदिलाबाद विशेष पंढरपूर येथून शनिवार 1 नोव्हेंबर आणि बुधवार 5 नोव्