जालना: मंठ्यात कालबाह्य झालेला चिवडा खाल्ल्याने तरुणास विषबाधा; अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईची मागणी
Jalna, Jalna | Jun 7, 2026 मंठा शहरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील मानव दुर्गा बिकानेर स्वीट मार्ट येथून खरेदी केलेला पॅकबंद फराळी चिवडा खाल्ल्यानंतर एका तरुणास विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.रविवार दि.7 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकारामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित दुकानावर कारवाईची मागणी होत आहे.मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द येथील अजय कानबा काळे (वय 23) यांनी चिवडा खरेदी केला होता.