महाड: विद्यार्थ्यांनी तयार केले सुगंधी उठणे.कोंडीवते जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम..@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 12, 2025 दिवाळी म्हणजे आनंद, उजेड आणि सुगंधाचा उत्सव. महाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोंडीवते येथील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीत नुसते उजेडच नाही, तर सुगंधही स्वतःच्या हातांनी निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी तब्बल २२ प्रकारच्या नैसर्गिक सुगंधी वनस्पती घटकांचा वापर करून पारंपरिक अभ्यंगस्नानासाठी लागणारे “सुगंधी उठणे” तयार केले आहे.