नागपूर ग्रामीण: कोराडीत भरदिवसा घरफोडी; १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथील धेंगरे ले-आउटमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी सौ. सरला सुरेंद्र राऊत (वय ४४ वर्ष) या २६ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० च्या दरम्यान आपल्या घराला कुलूप लावून थेरपी सेंटरमध्ये कामावर गेल्या होत्या. या दरम्यान अज्ञात चोराने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.