राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या.मात्र या निवडणूकांबाबत जनतेत तसेच सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर सभ्रम निर्माण झाला आहे. महानगरपालिकेच्या मतदार यादीची अंतिम सुची जाहीर होणार होती. परंतु निवडणूक आयोगाने ती 15 तारखेला जाहीर करण्यात येईल असे ऐनवेळी घोषित केले. मतदानाच्या एक दिवस आधी निवडणुका रद्द करणे, तारखा वाढवणे अशा अनेक विसंगती यावेळच्या निवडणूक प्रक्रियेत दिसून आल्या.