प्रभाग क्रमांक 20 अंतर्गत बैरागीपुरा येथे बारा मीटर रस्ता रुंदीकरण अंतर्गत रस्त्यात बाधित येत असलेल्या सतरा घरांवर अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही आज करण्यात आली. या कार्यवाहीदरम्यान सहाय्यक आयुक्त ताराचंद खंडाते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण आज हटविण्यात आले आहे. तब्बल 17 घरांवर अतिक्रमण कार्यवाही झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.