डॉ. भोयर यांच्या पुढाकारातून पोलिस विभागाचे आधुनिकीकरण वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस विभागाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे वर्धा शहर पोलिस ठाण्याची इमारत,पोलिस मुख्यालय येथे 200 निवासस्थाने तयार करण्यात आली आहे. हिंगणघाट पोलिस ठाणे व उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या इमरातीसाठी 6.68 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात अला आहे.