औंढा नागनाथ: नांदखेडा शिवारात देशी दारू भिंगरीची चोरटी विक्री करणाऱ्या एकावर औंढा नागनाथ पोलिसांची कारवाई
औंढा नागनाथ तालुक्यातील नांदखेडा ते बेरूळा जाणाऱ्या रोडवर नांदखेडा शिवारात अवैध देशी दारू भिंगरी संत्राची चोरटी विक्री करणाऱ्या एकावर औंढा नागनाथ पोलिसांनी 8 नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कारवाई करून देशी दारू भिंगरी संत्राच्या आठ सीलबंद बॉटल ज्याची किंमत 640 रुपये असा मध्यमान रद्द करून पोलीस जमादार गजानन गिरी यांच्या फिर्यादीवरून विजय कदम यांच्यावर दिनांक आठ नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री साडेआठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे .