परभणी: हानिकारक गोळ्या विक्री; एकजण ताब्यात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सहाय्यक पोलीिस निरीक्षक कासले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुचिता शिंगाडे यांनी घटनास्थळी चौकशी केली. या चौकशीत एक जण नशेच्या विविध गोळ्या विक्री करताना मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून हस्तगत केलेला मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनास तपासणीसाठी देण्यात आला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी पवन निळेकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल.