अकोला: अकोल्यात अनियंत्रित कार फूटपाथवर; महिलांच्या दिवाळी साहित्याचे नुकसान, शहरातील जठारपेट चौकातील घटना.
Akola, Akola | Oct 20, 2025 अकोला शहरातील जठारपेठ चौकात काल एक चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन थेट फूटपाथवर चढले. या ठिकाणी दिवाळी साहित्य विक्रीसाठी बसलेल्या महिलांच्या अंगावर कार गेल्याने एकच गोंधळ उडाला. प्रसंगावधानाने महिलांनी बाजूला होत आपला जीव वाचवला, मात्र दोन जण जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात भरती केले. तर अपघातात मात्र किरकोळ दुकानदार यांच्या दिवाळी साहित्याचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ कार अनियंत्रित होऊन हा अपघात घडला होता.