पुर्णा: भारती कॅम्प जवळ एसटीच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले ; झाडाखाली बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू पूर्णा पोलीसात गुन्हा दाखल
Purna, Parbhani | Oct 26, 2025 भारती कॅम्प जवळ पिकअप वाहन खराब झाल्याने ते थांबवून चालक मच्छिंद्र भोंग हे झाडाखाली जेवणासाठी बसले असता, तेवढ्यात झिरो फाटाकडून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली जाऊन झाडाखाली बसलेल्या पिकअप चालकास 'धडक दिल्याने चालक जखमी झाला. या पिकअप चालकास जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विठ्ठल भोंग यांच्या खबरीवरून पूर्णा पोलिसात बस चालक बाबुराव वावरे यांच्याविरुद्ध 24 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल.