राजुरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस, नगर विकास आघाडी राजुरा व शेतकरी संघटना समर्थित सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता बैठक आज दि 22 नोव्हेंबर ला 12 वाजता घेण्यात आली. या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून या निवडणुकीत सर्वांनी ताकदीने काम करावे अशा सूचना दिल्या.