महागाव: पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोली फाटा येथे तलवार बाळगणारा युवक अटकेत
महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोली फाटा येथे तलवार बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले उत्कर्ष संतोष पवार वय २१ राहणार चिंचोली असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी ३ वाजता कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे पितळी मुठ असलेली लोखंडी तलवार मिळून आल्याने भारतीय हत्यार कायदा सह विविध कलमान्वये पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.