अकोला: अकोल्यात उत्साहाने मतदान; हिवरखेड आघाडीवर 73.92% मतदान, जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती
Akola, Akola | Dec 2, 2025 अकोला जिल्ह्यात झालेल्या नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिवरखेडने सर्वाधिक 73.92% मतदान नोंदवून आघाडी घेतली. बार्शी टाकळी 73.07%, तर तेल्हारा येथे 70% मतदान झाले. मूर्तिजापूरमध्ये 64.50% तर अकोटमध्ये 65.12% इतकी मतदानाची नोंद झाली. एकूणच मतदारांच्या सहभागामुळे निवडणुकीबाबत सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले.अशी माहीती जिल्हा माहिती कार्यलयाने दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 10 वाजून 38 मिनिटांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे दिली आहे.