साक्री: पिंपळनेरला नगर परिषद निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
Sakri, Dhule | Nov 11, 2025 पिंपळनेर येथील नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्ण सज्ज झाली आहे.निवडणूक प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे टप्पे, कर्मचारी प्रशिक्षण, साहित्य वाटप, मतमोजणी आणि स्ट्राँगरूमची व्यवस्था पिंपळनेर येथील वीर भीमा नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, नवापूर रोड येथे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच अर्ज भरण्यापासून मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पिंपळनेरमध्येच पार पडणार असल्याने उमेदवार आणि मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.