तुमसर: शहरातील कस्तुरबा शाळेत माजी खासदार मधुकर कुकडे यांनी बजावला मतदानाचा अधिकार, नागरिकांना केले मतदानाचे आवाहन
तुमसर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरिता आज दि. 2 डिसेंबरला सकाळी 7 वाजता पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान तुमसर नगरपरिषद कस्तुरबा शाळेतील मतदान केंद्रावर आज सकाळी 11.30 वाजता भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खा. मधुकर कुकडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन केले.