लातूर -त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी लातूर शहरातील हत्ते नगर परिसरामध्ये वसलेल्या श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात पारंपरिक उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. संध्याकाळी बरोबर सात वाजता मंदिर परिसर असंख्य दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला आणि वातावरण भक्तीभावाने दुमदुमले.या प्रसंगी भावसार समाजातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.