जालना: जाफ्राबादमध्ये वेश्याव्यवसायावर छापा; शेडमालक महिलेसह एक ग्राहक ताब्यात; गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Jun 17, 2026 जाफ्राबाद शहरातील जिल्हा परिषद शाळेजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष जालना आणि जाफ्राबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. बुधवार दि. 17 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत शेडमालक महिलेसह एका ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, जालना येथे गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली.