माजलगाव: माजलगाव एमआयडीसी जवळ दोन ट्रकचा समरासमोर भीषण अपघात, दोन्ही चालक गंभीर जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल
माजलगाव एमआयडीसी परिसरात आज सकाळी दोन ट्रकचा जोरदार अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही ट्रकच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून, दोन्ही चालक जखमी झाले आहेत. एमआयडीसी परिसरातील रस्त्यावरून दोन ट्रक समोरासमोर येत असताना वेगावर नियंत्रण सुटल्याने एकमेकांवर जोरदार धडकले. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चुराडा झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी चालकांना बाहेर काढले आणि उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आले.