अलिबाग: मनसेच्या मागणीला यश; आग्राव-बोरिवली बस सेवा पुन्हा सुरू
Alibag, Raigad | Sep 22, 2025 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर आग्राव-बोरिवली बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कोरोना काळात बंद पडलेली ही सेवा तब्बल साडेचार वर्षांनी पुन्हा रुळावर आल्याने आग्राव, चौल, नागाव व अलिबाग परिसरातील प्रवाश्यांचा मोठा प्रश्न सुटणार आहे. आज दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ही बससेवा सुरू करण्यात आली.