भंडारा: शहरातील शुक्रवारी परिसरातून घरासमोरून मोटरसायकल चोरी; गुन्हा दाखल, तपास सुरू
भंडारा शहरातील सुभाष वाॅर्ड, शुक्रवारी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची घरासमोर उभी असलेली मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. संजय झिबल पडोळे (वय ४७, रा. सुभाष वाॅर्ड, शुक्रवारी) यांनी ११ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते १२ सप्टेंबर रोजी पहाटे ४:३० वा. दरम्यान त्यांची हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल क्र. एमएच ३६ बी २१६४ ही १५,००० रुपये किमतीची मोटरसायकल घरासमोर ठेवली होती.