पालघर: अमली पदार्थ तयार करण्याच्या कारखान्यावर नालासोपारा येथे अँटीनार्कोटिक्स विभागाचा छापा; 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
नालासोपारा येथे अमली पदार्थ तयार करण्याच्या कारखान्यावर अँटी नार्कोटिक विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांना कारखान्यात तयार करण्यात येत असलेले एमडी ड्रग्स म्हणजेच मेफेड्रोन हा अमली पदार्थ, अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत एमडी ड्रग्स, ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा तब्बल 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.