चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; जिल्ह्यातील तळोधी(खुर्द) परिसरातील घटना
स्वतःच्या मालकीची बैल जोडी घेऊन चराईसाठी नेत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर आज दि.१३ नोव्हेंबर ला २ वाजता हल्ला केला. पांडुरंग गोविंदा तिजारे वय (७५ ) राहणार तळोधी( खुर्द) असे जखमीचे नाव आहे . ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तळोधी (खुर्द )येथील गुराखी पांडुरंग गोविंदा तिजारे वय (७५) हे नेहमीप्रमाणे आपली बैल जोडी चरायसाठी पटाच्या दाणी जवळ घेऊन गेले असता. अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला.