भोकरदन: वालसावंगी शेत शिवारात वडोद फाट्यावर हिरव्या झाडांची दिवसाढवळ्या कतल,वन विभागाचे दुर्लक्ष
आज दिनांक 2 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील शेत शिवारात वडोद तांगडा फाट्यावर दिवसाढवळ्या हिरव्यागार झाडांची कतल केल्याचे पाहायला मिळाली आहे, यामध्ये आंबा लिंब गोंधण यासारख्या झाडांची तोड केली असूनही तोड लाकूडतोड्यांनी केली असल्याचे पाहायला मिळाले आहे ,याकडे वन विभागाची दुर्लक्ष होत आहे तर दुसरीकडे राज्य सरकार केंद्र सरकार म्हणते झाडे लावा तर जालन्यात मात्र वृक्षतोड सुरू आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.