राजाभोज यांची जयंती साजरी करण्याच्या अनुषंगाने गोरेगाव तालुका महिलांची सभा जंगल कामगार भवन येथे संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष स्नेहाबाई कोल्हे ह्या होत्या.प्रमुख उपस्थिती म्हणून रोशनीबाई तूरकर व अनिताबाई तूरकर उपस्थित होत्या.वं तालुका संयोजक चित्रकला चौधरी या सर्वांच्या उपस्थिती मध्ये सभेला सुरुवात करण्यात आली. सभेमध्ये राजाभोज यांची जयंतीच्या अनुषंगाने कार्यक्रम घेण्याविषयी चर्चा करण्यात आली.कार्यक्रमात महीलांचा सहभाग व सांस्कृतिक भागीदारी यावर चर्चा करण्यात आली