ठाणे: ठाण्यातील काँग्रेस कार्यालय येथे युवक काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आंदोलन
Thane, Thane | Sep 17, 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. अशातच आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास ठाण्यातील काँग्रेस कार्यालय येथे युवक काँग्रेसने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी युवक काँग्रेसने केक कापून आंदोलन केलं असून वोट चोर गद्दी छोड अशा घोषणा देण्यात आल्या.