अकोट: अकोला मार्गावरील हॉटेल सागवानच्या मागील जुगारावर पोलिसांचा छापा;१ लाख ८२ हजार रुपयांच्या मुद्देमालसह ९ आरोपींना अटक
Akot, Akola | Oct 19, 2025 अकोट- अकोला रोडवरील हॉटेल सागवानच्या मागे काही ईसम तीन पानी परेल नावाचा जुगार खेळत आहे. ह्या खात्रीलायक बातमीवरून सदरची माहिती सहायक पोलीस अधिक्षक निखील पाटील यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टॉफ व पंचासह जुगार रेड केली असता. एकुण ९ ईसम जुगार खेळतांना आढळून आल्याने पंचासमक्ष त्यांना नाव गाव विचारून अटक करण्यात आली आलीय घटनास्थळावरून पंचासमक्ष ५२ पत्ते, नगदी २२,५०० रुपये, पाच मोटरसायकल किंमत अंदाजे १,६०,००० रुपये असा एकुण १,८२,५०० रुपयांचा ऐवज पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.