कामठा येथे संत श्री लहरीबाबा यांच्या जन्मोत्सव सप्ताहानिमित्त आयोजित विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमधे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर सहभागी झाले. यावेळी श्री संत लहरीबाबा आश्रम संस्थान, कामठा आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कृषी प्रदर्शनीचे आयोजनही करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी शेतकरी बांधवांशी संवादही साधला.