कुंभमेळा साधूंसाठी असतो. वृक्षतोडीला विरोध केला जातो तर मग साधुग्राम सापुताऱ्यात न्यायचे का? असा प्रश्न महंत हरीगिरी यांनी केला. त्यांनी कुंभमेळ्यासंदर्भात प्रशासनाकडून काय कामे होत आहेत याची तपोवनात जाऊन पाहणी केली. त्र्यंबकेश्वर परिसरातील साधू-महंतांनी रामकुंड, काळाराम मंदिरासह तपोवन परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. साधुग्राममध्ये १८०० वृक्ष तोडण्यास नागरिकांकडून विरोध केला जात आहे. मात्र नागरिकांनी गोदावरीच्या उगमापासून ते संगमापर्यंत १८ लाख वृक्ष लावण्याचा विचार आहे