नागपूर शहर: चाकूच्या धाकावर झोमॅटो बॉयला लुटणाऱ्या आरोपीला अटक : दिगंबर कोपरे सहाय्यक पोलीस निरीक्षक
धंतोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर कोपरे यांनी 2 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, चाकूच्या धाकावर झोमॅटो बॉयला लुटणाऱ्या आरोपीला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आरोपींनी दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली होती. याबद्दलची सविस्तर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर कोपरे यांनी दिली आहे.