खटाव: सद्गुरु सेवागिरी महाराज यांचा प्रकटदिन सोहळा सुवर्णनगरी पुसेगावमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये उत्साहात साजरा
Khatav, Satara | Oct 18, 2025 महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सुवर्णनगरी पुसेगाव येथे सिद्धहस्त योगी परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा शनिवारी दुपारी बारा वाजता विविध धार्मिक कार्यक्रमांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. धनत्रयोदशी दिवशी पुसेगावमध्ये परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांचे आगमन झाले होते , त्यामुळे यावर्षीपासून महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा करण्याचा निर्धार पुसेगावकरांनी केला होता.