केज: उकिरड्याच्या खड्ड्यात पडून सात वर्षे चिमुकलीचा मृत्यू झाला, चिंचोली माळी येथील घटना
तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील बजगुडे वस्तीवर रविवारी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराशेजारी उकिरड्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून आर्या अमोल बजगुडे (वय ७) या पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.आर्याचे आई-वडील, अमोल बजगुडे आणि त्यांची पत्नी, हे दोघेही रविवारी शाळेला सुट्टी असल्याने आर्याला घरी ठेवून घराशेजारील शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आर्या खेळता खेळता घराजवळील उकिरड्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ गेली.