जालना: उष्णतेच्या लाटेपासून कामगारांचे संरक्षण करा — सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन..
Jalna, Jalna | Apr 29, 2026 उष्णतेच्या लाटेपासून कामगारांचे संरक्षण करा — सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन.. आज दिनांक 29 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने सर्व आस्थापना मालकांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. श्रम व रोजगार मंत